सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Thursday, March 1, 2012

जानेवारी २०१२ विशेष

updates - Jan to Mar 2013
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा मंडळात ११ जागा 
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा मंडळात लिपिक टंकलेखक (९ जागा), संगणक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

एमपीएससीमार्फत ६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयात संशोधन अधिकारी (१ जागा), अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक (१ जागा), विधी व न्याय विभागातील सहायक प्रारुपकार नि अवर सचिव (३ जागा), सॉलिसिटर-नि-उपसचिव (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात ५ जागा 
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई येथील कार्यालयात विभाग संपादक (२ जागा), सह  संपादक (३ जागा) ही पदे ठोक मानधनावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानमध्ये ७ जागा 
केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानाच्या कार्यालयांत रीडर-स्पीच पॅथोलॉजी (१ जागा), व्याख्याता-एसपी अँड एचजी (१ जागा), व्याख्याता-शिक्षण (३ जागा), व्याख्याता –मानसशास्त्र (१ जागा), व्यावसायिक समुपदेशक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये ६ जागा 
पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), भांडारपाल (२ जागा), एक्स रे इलेक्ट्रिशियन (१ जागा), शिपाई (१ जागा), चौकीदार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदासाठी भरती 
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती www.joincoastguard.org या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये १४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात १५ जागा 
केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे कनिष्ठस्तर लिपिक (२ जागा), बूट मेकर (१ जागा), संदेशक (५ जागा), वॉशर मॅन (२ जागा), न्हावी (१ जागा), सफाईवाला (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत १६४ जागा 
नवी मुंबई महानगरपालिकेत सहायक कर निर्धारक व संकलक (१ जागा), प्रशासकीय अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (१ जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (५४ जागा), उप लेखापाल (४ जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (३ जागा), सी.एस.एस.डी. (१ जागा), रक्तपेढी तंत्रज्ञ (१ जागा), डायलिसिस तंत्रज्ञ (४ जागा), मिश्रक औषध निर्माता (३ जागा), वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक (४ जागा), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (१२ जागा), अळी निरीक्षक (१ जागा), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (१ जागा), अनुरेखक (१ जागा), समयलेखक (१ जागा), दूरध्वनी चालक (१ जागा), वाहन चालक –अग्निशमन (२ जागा), वाहनचालक (२० जागा), प्लंबर/फिटर (४ जागा), उद्यान सहाय्यक (५ जागा), व्रणोपचारक (१ जागा), नोटीस बजावणीस (१ जागा), वॉचमन (१ जागा), शिपाई (१५ जागा), आया (४ जागा), वॉर्डबॉय (८ जागा), माळी/बहुउद्देशीय सेवक (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज MKCL च्या अधिकृत केंद्रावर भरता येईल. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http:/oasis.mkcl.org/nmmc या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

सर्व्हे ऑफ इंडियामध्ये १६ जागा
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व्हे ऑफ इंडियामध्ये टोपो ट्रेनी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.surveyofindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ जागांसाठी भरती 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (१ जागा), उपप्रबंधक (१ जागा) तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (९ जागा), भाषा उपसंचालक-अनुवाद व शब्दावली (१ जागा), अनुवादक-हिंदी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

सिडको व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत १८ जागा
सिडकोच्या सिडको व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ प्रशिक्षक (२ जागा), प्रशिक्षक (९ जागा), परीक्षा नियंत्रक (१ जागा), संगणक चालक (२ जागा), टेलिकॉलर (२ जागा), क्लार्क/क्षेत्रीय सहाय्यक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी आपला बायोडाटा cidcocvti@gmail.com या ईमेल वर पाठवावा. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. १० जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात माजी सैनिकांसाठी २१० जागा 
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात माजी सैनिकांमधून कॉन्स्टेबल-ट्रेडस्मन (२१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in किंवा www.cisfrecruitment.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. २ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये ३५ जागा 
इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये अभियांत्रिकी सहायक (२२ जागा), टेक्निकल अटेंडंट (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१२ आहे. अधिक माहिती www.iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दित. ४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात कनिष्ठ वाहन चालकांच्या ५७ जागा 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) कनिष्ठ वाहनचालक (५७ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद परिमंडळात ६२७ जागा 
प्रादेशिक निवड समितीद्वारे जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद परिमंडळातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (५७ जागा), कालवा निरीक्षक (१४४ जागा), मोजणीदार (१०३ जागा), दप्तर कारकून (५२ जागा), वरिष्ठ लिपिक (६८ जागा), भांडारपाल (२४ जागा), सहाय्यक भांडारपाल (१६ जागा), कालवा चौकीदार (४४ जागा), चौकीदार (३२ जागा), शिपाई (८७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती www.oasis.mkcl.org/wrd२०११ व http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात १४९५ जागा
पुणे प्रादेशिक निवड समितीद्वारे जलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (३ जागा), कनिष्ठ वैज्ञानिक सहायक (४ जागा), संशोधन सहाय्यक (४ जागा), वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (२ जागा), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (१४ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (९ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (२५६ जागा), प्रमुख आरेखक (३ जागा), आरेखक (८ जागा), सहाय्यक आरेखक (१५ जागा), अनुरेखक (६८ जागा), संदेशक (३३ जागा), तारतंत्री (२ जागा), वीजतंत्री (१७ जागा), वाहनचालक (१६८ जागा), वरिष्ठ लिपिक (१४२ जागा), लिपिक नि टंकलेखक (१४७ जागा), भांडारपाल (१६ जागा), सहाय्यक भांडारपाल (१३ जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (३ जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (५ जागा), लघु टंकलेखक (६ जागा), दप्तर कारकून (१०० जागा), कालवा निरीक्षक (३३३ जागा), मोजणीदार (१२४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती www.wrdrecruitmentpune.com आणि http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात कनिष्ठ सुरक्षा रक्षकाच्या 203 जागा 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) कनिष्ठ सुरक्षा रक्षक (203 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत व लोकसत्तामध्ये दि. 5 जानेवारी 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळात १० जागा
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळात प्रशासकीय अधिकारी (१ जागा), सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (५ जागा), कनिष्ठ लघुलेखक (२ जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१२ आहे. अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in/mbusiness/MGITD/Pages/CareersAndOpportunities.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.